काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

काय आहे कारण? पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ऑफिस बंद करायची वेळ

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्यांचं ऑफिस बंद करायची वेळ आली आहे. बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवारी लाहोरमधलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मुख्यालय बंद करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी सहा क्रिकेटपटू आणि एका सहकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगही स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता बोर्डाच्या आणखी एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएसएल स्थगित झाल्यानंतर संघासाठी हॉटेलमध्ये आणि स्टेडियममध्ये बायो-बबलचे नियम लागू करण्यावरून पीसीबीवर टीका करण्यात आली. पीसीबीच्या चिकित्सा पॅनलचे प्रमुख डॉक्टर सोहेल सलीम यांनी याप्रकरणी अध्यक्ष एहसान मणी यांच्याकडे राजीनामा सोपावला. तर दुसरीकडे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सदस्यीय मेडिकल पॅनलची स्थापना केली आहे. बायो-बबलमध्येही खेळाडूंना कोरोना कसा झाला, याची चौकशी हे पॅनल करणार आहे.

मेडिकल पॅनलमध्ये डॉक्टर सय्यद फैजल महमूद आणि डॉक्टर सलमाम मोहम्मद यांचा समावेश आहे. हे दोन्ही डॉक्टर पीएसएलमधल्या बायो-बबल प्रोटोकॉलची समिक्षा करतील. 31 मार्चपर्यंत हे पॅनल पीसीबीकडे त्यांचा रिपोर्ट सोपवेल.