भयानक ! भंडाऱ्यातील परिस्थिती वाईट; लाईनमध्येच रचून ठेवल्या आहेत चिता
बातमी विदर्भ

भयानक ! भंडाऱ्यातील परिस्थिती वाईट; लाईनमध्येच रचून ठेवल्या आहेत चिता

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतिगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीचं भयावह चित्र समोर आलं आहे. भंडारा स्मशानभूमीत मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशसानावर आली असून एकाच वेळी 20-25 कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. […]

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा
राजकारण

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आले होते. यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्चसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. नाना पटोले म्हणाले की, ‘बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ […]

या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत:  उद्धव ठाकरे
बातमी महाराष्ट्र

या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत: उद्धव ठाकरे

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला! या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा […]

भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा
बातमी महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचाबाबत अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने […]

भंडारा जिल्हा रुग्णालयातील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
बातमी महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयातील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी […]

आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
बातमी महाराष्ट्र

आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी इतका दुर्दैवी ठरेल याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. संपूर्ण राज्य मध्यरात्री साखरझोपेत असताना भंडारा जिल्ह्यात मात्र काळाने दहा नवजात बालकांवर घाला घातला. महाराष्ट्रात इतकी हृदयद्रावक घटना ही पहिल्यांदाच घडली असावी. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या […]