आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू
बातमी महाराष्ट्र

आणि… काळजाचं पाणी पाणी झालं! शिशुकेअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

आजचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी इतका दुर्दैवी ठरेल याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. संपूर्ण राज्य मध्यरात्री साखरझोपेत असताना भंडारा जिल्ह्यात मात्र काळाने दहा नवजात बालकांवर घाला घातला. महाराष्ट्रात इतकी हृदयद्रावक घटना ही पहिल्यांदाच घडली असावी. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. त्यानंतर बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या लक्षात येताच तिने दर उघडून पाहिले असता असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली.

अग्रिशामक दल रुग्णालया पोहचले. तोपर्यंत रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे.