शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेती

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७ : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास श्री. ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी […]

महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, : ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस, महानगरपालिका बांधकाम या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही काम पूर्ण करावी. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला
बातमी महाराष्ट्र

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

ठाणे, : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण […]

राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसूलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या कोळसा आणि खनिकर्म गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय […]

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार […]

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी राडा; EWSबाबतच्या निर्णयानंतर मराठा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी राडा; EWSबाबतच्या निर्णयानंतर मराठा मोर्च्याचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात आलेल्या विविध पदांवरील उमेदवारांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. मात्र मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. कारण आजच मुंबई हायकोर्टाने सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोर्टाकडून […]

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं
राजकारण

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केल्यानेच आम्ही बंडाचा निर्णय घेतला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच एक नवा गौप्यस्फोट करत शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर २०१४ सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं आणि […]

अदानी ठाकरेंना भेटून काही तास उलटताच मुकेश अंबानी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
बातमी मुंबई

अदानी ठाकरेंना भेटून काही तास उलटताच मुकेश अंबानी एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी हे दोघे शनिवारी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर गेले होते. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. मध्यरात्र उलटल्यानंतर […]

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी मराठवाडा

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड 8 :- नांदेड महानगराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पुर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पुर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. 192 कोटीच्या होणाऱ्या रस्ते विकासातून या भागातील वाहतुक […]

गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी महाराष्ट्र

गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता पुणे, :- गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी […]