जय भीम ॲपचा लोगो दुबईत लाँच; काय आहे हे ॲप?
टेक इट EASY

जय भीम ॲपचा लोगो दुबईत लाँच; काय आहे हे ॲप?

दुबई : दुबई इंटरनॅशनल आयकॉन्स अवॉर्ड्स येथे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत गिरीश वानखेडे यांनी शॉर्ट व्हिडिओ ॲप ‘जय भीम’ चा लोगो लॉन्च केला. शनिवारी 25 सप्टेंबर रोजी या ॲपचा लोगो लाँच करताना यावेळी बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा, अदिती राव हैदरी, झरीन खान, संदीप धर, डेझी शाह यांच्या सारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या ॲपच्या मदतीने देशभरातील छोट्या-मोठ्या शहरांतील तरुणांना यामध्ये व्हिडिओ पोस्ट करता येणार आहेत. ॲपमधील ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होतील त्यांना अर्थार्जन करण्याचीही संधी मिळणार आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारचे स्वतंत्र देण्यात आले असून हे ॲप तरुणाईला मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करेल.

यावेळी ॲपचे सीईओ गिरीश वानखेडे म्हणाले, जय भीम ॲप तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकवून ठेवण्यास मदत करेल. जे गेल्या दोन दशकांपासून मनोरंजनाच्या व्यवसायात आहेत, ज्यांचे स्वतःचे कौशल्य आहे त्यांच्यासाठी या ॲपद्वारे मोठी संधी निर्माण होणार आहे. हे ॲप शॉर्ट व्हिडिओ बनविणाऱ्याना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जगभरातील व्यक्तींचा यामध्ये समावेश होणार असल्याने अनेकांशी संपर्काचे साधन हे ॲप बनू शकते.

जय भीम ॲप हे केवळ मनोरंजन करण्यासाठी तयार करण्यात आलेले नसून इतर क्षेत्रातील शॉर्ट व्हिडिओही या ॲपमध्ये असणार आहेत. हे ॲप मनोरंजनाव्यतिरिक्त उद्योजकतेवर देखील लक्ष केंद्रित करणार आहे. हे फक्त फर्स्ट लुक लाँच असल्याने, अधिक खुलासा होणे बाकी असल्याचे यावेळी वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.

जय भीम ॲप हे छोट्या शहरांतील तरुणांना मनोरंजनाच्या संधी आणि उद्योजकतेबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. इतर ॲप केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित करतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. या व्यतिरिक्त युवकांच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत. ज्या त्यांची ऊर्जा वापरून पूर्ण केल्या जाऊ शकतात. जय भीम ॲपच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जपण्याचा विचार करण्यात येणार आहे. त्यात विचारांचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे हे ॲप तरुणांच्या पसंतीस उतरणार आहे.

तरुणांची जयभीम नावाला पसंती
शॉर्ट व्हिडिओ ॲपला जयभीम नाव देण्याबद्दल तरुणांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये असे आढळून आले की, बहुतांश तरुणांना शॉर्ट व्हिडिओ ॲपला जयभीम नाव देण्यात समानतेचा संदेश आणि सन्मानजक वाटले. कारण डिजिटल क्षेत्रातील इतक्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नारा देणे प्रत्येकासाठी अभिमानास्पद असल्याचे तरुणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

म्हणून ॲपचे नाव जय भीम
ॲपला जय भीम हे नाव देण्यामागे कारण असल्याचे वानखेडे सांगतात. ॲपच्या नावाने भारतीयता आणि समानतेबद्दल संदेश जातो. त्याचबरोबर, चौकटीबाहेरील विचारांसह हे ॲप पुढे येते. हे एक विशिष्ट तत्वज्ञान, जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन समोर ठेऊन प्रत्येक तरुणाला त्याच्या प्रगतीबद्दल जागरूक करून आणि मनोरंजन करेल. हे ॲप तरुणाईला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणण्यासाठी महत्त्वाचे ठरेल असेही वानखेडे म्हणाले.

गिरीश वानखेडे यांच्याविषयी…
गिरीश वानखेडे हे बॉलीवूड मधील नावाजलेले व्यक्तिमत्व असून ते पीव्हीआर सिनेमाचे खूप वर्ष मार्केटिंग हेड होते. तसेच त्यांचे सगळ्या बॉलीवूड स्टार्स, प्रोड्युसर्स यांच्या सोबत चांगले संबंध असल्यामुळे ह्या जयभीम अँप मधील क्रिएटर्सना खूप फायदा होऊ शकेल.