तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…
वायरल झालं जी

तिने गुढघे टेकत त्याला दिलं प्रेमाचं प्रपोजल; मग जे झालं…

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाला एक वेगळेच स्थान असते. आई वडिलांनंतर एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते जी आयुष्यभर सोबत राहावी असते वाटते. त्यातच प्रेमात असलेली व्यक्ती प्रचंड संवेदनशील असते. प्रेम जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये असतं आणि समोरच्या जोडीदारापुढे व्यक्त करायचं असेल तर तो क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळं करावं, अशी भावना प्रत्येकाच्या मनात येते. त्यामुळे सध्या तरुण अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांसमोर आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करत असतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशातच असाच एक सुंदर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. खरंतर सामान्यपणे मुलगा गुडघे टेकवून मुलीला प्रपोज करताना आपण अनेकदा पहिले असेल. पण या व्हायरल व्हिडीओत चक्क मुलगी जमिनीवर गुडघा टेकून प्रेम व्यक्त करत आहे. तो क्षण, ते वातावरण आणि त्या वातावरणाचे साक्षीदार असलेल्या लोकांची दाद, हे सर्व दैदीप्यमान असं वातावरण व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ते कपल नेमकं कोण आहे त्याची माहिती मिळाली नाही पण तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘uol_inside’ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय.

https://www.instagram.com/p/CMR7W55hHRs/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडीओत एका टेबलवर फुलांच्या पाकळ्या दिसत आहेत. एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन जमिनीवर गुडघा ठेवते. तिच्यासमोर काळ्या शर्टात एक सुंदर मुलगा उभा आहे. ती त्या मुलाला जमिनीवर गुडघं टेकून प्रमोज करते. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करते आणि त्याच्या हातात पुष्पगुच्छ देते. मुलगा तिच्या प्रपोजचा स्वीकार करतो आणि मुलीच्या हातातून पुष्पगुच्छ घेतो. त्यानंतर दोघं मिठी मारतात. यावेळी मुलीच्या डोळ्यांमधून अश्रू येतात. तर मुलगा गोड स्मितहास्त देत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे त्यांच्या आजूबाजूला काही तरुण मोबाईलवर त्यांचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. मुलाने मुलीचा प्रपोज स्वीकारल्यानंतर ते आनंदाने ओरडायला लागतात.