ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…
वायरल झालं जी

ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…

नवी दिल्ली : प्रत्येक मुलाला वाटत असते त्याची एखादी गर्लफ्रेंड असावी, आणि तिला आपलंसं करण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तो अनेक मार्ग शोधत असतो. अशाच एका मुलाने त्याला आवडणाऱ्या मुलीला थेट सोशल मिडीया वरून प्रपोज केलं आहे. मात्र त्याचा मेसेज पाहून कोणालाही हसू फुटेल असा मेसेज त्याने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खरंतर, आधी प्रपोज करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या पण हल्ली प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यानेही असेच काही केले आहे. मुलाने मेसेज मधून तिला प्रपोज केलं असून तिचा होकार मिळवण्यासाठी वाट्टेल ते करू शकतो असेही त्याने म्हंटले आहे. खरंतर, प्रपोज करणारा हा मुलगा अकरावीचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याने मेसेज पाठवून मुलीला प्रपोज केले. त्या बदल्यात मुलीचं उत्तर पाहून सर्वांनाच हसू फुटलं आहे.

Anti Pigeon नावाच्या युजरने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘मी दिल्लीचा आहे… आणि आता मी 11 वीचा विद्यार्थी आहे. तू खूप सुंदर आहेस… तू माझी गर्लफ्रेंड होशील का?’ तेव्हा मुलीने या मेसेजला उत्तर दिले नाही, तेव्हा मुलाने पुढे लिहिले की, ‘माझ्या वडिलांचा खूप मोठा शिपिंग व्यवसाय आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो पण प्लीज, तू माझी गर्लफ्रेंड होशील का.‘

त्याचवेळी मुलीने उत्तरात लिहिले की, ‘प्लीज शाळा सुरू करा’. इतकेच नाही तर मुलीने पुढे असेही लिहिले की, ‘मला यात काही वाईट वाटलं नाही, खूप मेजदार आहे’. कारण, हा मुलगा मला त्याच्या वडिलांच्या जीवावर प्रपोज करत आहे.” तुम्हाला हे स्क्रीनशॉटमध्येही दिसेल. सोशल मीडियावर काही व्हायरल झालं तर त्याने नेटकऱ्यांवरही मोठा परिणाम होतो. कधीकधी गोष्टी हसण्यासारख्या असतात, तर कधी आश्चर्यचकित करण्यासारखा आताही हे प्रकरण सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरलं आहे.