नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजस्थानमधील आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झालं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Saddened to know of the untimely demise of BJP leader & Rajsamand MLA Kiran Maheshwari ji. My heartfelt condolences to her family members & supporters in this most difficult time. May God give them strength to bear this loss. May her soul rest in peace. #Rajasthan
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 30, 2020
दरम्यान देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. सर्व सामान्य जनतेपासून ते दिग्गज व्यक्तींना देखील या महामारीचा सामना करावा लागत आहे. नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.