भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून झाहूर अहमदला अटक
देश बातमी

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून झाहूर अहमदला अटक

नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून दहशतवादी झाहूर अहमदला अटक करण्यात आली आहे. सांबा जिल्ह्यातून जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही अटक केली आहे. मागच्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणात झाहूर अहमद सहभागी असल्याचा संशय आहे. झाहूर अहमदवर कुलगामच्या फुर्राह भागात एका पोलिसाचीही हत्या केल्याचाही संशय आहे. त्याला पुढील तपासासाठी काश्मीर येथे आणण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनंतनागमधील पोलीस पथकाने १२ आणि १३ फेब्रुवारीच्या रात्री झाहूर अहमद उर्फ साहीलला सांबामधून ताब्यात घेतले. तो सांबामध्ये लपून बसला होता. एका विशेष माहितीच्या आधारावर अनंतनाग पोलिसांनी त्याला अटक केली, असे पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.

मागच्यावर्षी २९ ऑक्टोंबर २०२० रोजी कुलगामच्या वायके पोरा वस्तीमध्ये फिदा हुसैन यातू, उमर राशिद बेग आणि उमर रमजान हाजम या तीन भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. हे तिघेही कारमधून जात असताना रात्री ८.२० च्या सुमारास त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोर अल्टो कारमधून पसार झाल्याचे स्थानिकांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना सांगितले होते.