मेलबर्न कसोटी सामन्यांपूर्वी महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली
क्रीडा

मेलबर्न कसोटी सामन्यांपूर्वी महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. हा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली वाहिली. जोन्स यांचे तीन महिन्यांपूर्वी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान मुंबईमध्ये निधन झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेलबर्नच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जोन्स यांचा परिवार आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर उपस्थित होते. बॉर्डर यांनी जोन्सची पत्नी आणि दोन मुलींसह मैदानाला एक फेरी मारली. यावेळी त्यांच्या हातामध्ये जोन्स यांची बॅगी ग्रीन कॅप, गॉगल आणि बॅट होती. त्यांनी मैदानाच्या ग्रेट सदर्न स्टँडपाशी त्यांच्या या सर्व आठवणी ठेवल्या. त्यानंतर दोन्ही टीम्सचे बारावे खेळाडू के.एल. राहुल आणि जेम्स पॅटिन्सन यांनी हे सर्व साहित्य उचलून जवळच्या एका खुर्चीवर ठेवले. यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून जोन्स यांना मानवंदना दिली.

जोन्स 1984 ते 1992 दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाकडून 52 कसोटी सामने खेळले. त्यात 11 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3631 धावा केल्या. 1984 ते 1994 दरम्यान 164 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी 6068 रन केल्या. एक दिवसीय सामन्यांमध्ये 7 शतकं आणि 46 अर्धशतकं त्यांच्या नावावर आहेत. अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पुनरुज्जीवित झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे ते महत्त्वाचे खेळाडू ठरले.[r