जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट
क्रीडा

जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट

गोवा : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत विवाहबंधनात अडकला. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत दोघांनी गोव्यात लग्न केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतून स्वत:ला वगळण्यात यावे अशी विनंती केली होती. जसप्रीतने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे रजा मागितली होती, ती मान्य करण्यात आली. पण काही दिवसांनंतर कळले की जसप्रीत बुमराह लग्न करणार आहे.

सोशल मीडियावर देखील बुमराह कोणाशी विवाह करणार याची चर्चा सुरू होती. प्रथम एका दक्षिणेतील अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. पण नंतर पुण्यात जन्मलेल्या संजना गणेशन सोबत तो विवाह करणार असल्याचे समोर आले. दरम्यान, लग्नासाठी सुट्टी घेतलेल्या बुमराहचा टी-२० आणि वनडे मालिकेसाठी देखील विचार केला जाणार नाही. त्यामुळे आता भारताचा हा दिग्गज गोलंदाज थेट ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहला आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना पाहता येईल.

कोण आहे संजना गणेशन
संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती. संजना मॉडेल आणि क्रीडा निवेदिका (अँकर)आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले.