धोनी पार्थिवनंतर आणखी एका भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्ती
क्रीडा

धोनी पार्थिवनंतर आणखी एका भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्ती

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी आणि पार्थिव पटेल यांच्यानंतर भारताच्या आणखी एका यष्टीरक्षक फलंदाजाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नमन ओझानं सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्ये प्रदेशकडून खेळणाऱ्या ३७ वर्षीय ओझानं एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओझानं १४६ प्रथम श्रेणी सामन्यांत २२ शतकांसह १७५३ घावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली डेअडेव्हिल्स या संघाकडून तो आयपीएलमध्ये खेळला आहे. ११३ आयपीएल सामन्यात सहा अर्धशतकासह ओझानं १५५४ धावा केल्या आहेत. आतंरराष्ट्रीय सामन्यात ओझाच्या नावावर एकाही शतकाची किंवा अर्धशतकाची नोंद नाही. कसोटीतील ३५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

भारतासाठी तसेच राज्यासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी समाधानी आहे. परंतु आता पुढे जाण्याची वेळ असून मी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करम्याचा निर्णय घेतला आहे, असे ओझा म्हणाला.