मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला जान्हवी कपूरचा चित्रपट रुही सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. कोरोना महामारीनंतरचा हा सगळ्यात हिट चित्रपट ठरत आहे. कोरोना महामारी असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटीहूनही अधिक कमाई केली.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
जान्हवी कपूर, राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हार्दिक मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. अजून चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. हळूहळू ती सुरु होत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाची पहिल्या दिवसाची ३ कोटींची कमाई ही ९-१० कोटींसारखीच म्हणावी लागेल. कोरोना काळात या आधी कोणत्याही चित्रपटाने पहिल्या दिवशी इतकी कमाई केलेली नाही.
#Roohi contribution from national multiplex chains… Day 1 [Thu]… #MahaShivratri holiday…#PVR: ₹ 93 lacs#INOX: ₹ 60 lacs#Cinepolis: ₹ 32 lacs
Contribution from these three chains is approx ₹ 1.85 cr on Day 1, despite #Covid pandemic. https://t.co/MnI6YZJweD— taran adarsh (@taran_adarsh) March 12, 2021
२०१९ सालच्या स्त्री या चित्रपटाचाच हा पुढचा भाग आहे. त्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात जान्हवी एका गावातल्या मुलीची भूमिका साकारत आहे. राजकुमार आणि वरुण यांनी साकारलेली पात्र या मुलीचं अपहरण करतात आणि मग त्यांना तिच्या चेटकीण असण्याबद्दल कळतं. साधारण अशा पद्धतीची ही कथा आहे.