क्रीडा

पठाणच्या सेटवरील शाहरुखचे व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी पठाण या सिनेमामुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना शाहरुखच्या अ‍ॅक्शन सीनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पठाण सिनेमाच्या शूटिंगच्या या व्हिडीओत शाहरुख एका गाडीवर उभं असल्याचं दिसतं आहे. तसेच चालत्या गाडीवर एका स्टंटमनसोबत तो फाईट करत आहे. या गाडीच्या शेजारुन दुसरी गाडी जात असून गाडीवर असलेल्या ट्रॉलीवर कॅमेरा दिसून येत आहे. किंग खानच्या काही फॅन्सनी हे व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले असून हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. याआधी देखील पठाण सिनेमातील काही सीन लीक झाले होते. या व्हिडीओत शाहरुख जबरदस्त स्टंट करताना दिसून आला होता. एका ट्रकवर या अ‍ॅक्शन सीनंच शूटींग करण्यात आल्याचं दिसून आलं. तर एका व्हिडीओत सर्वाच उंच बुर्ज खलिफा इमारतीसमोर शूटिंग असल्याचं दिसून आलं आहे.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स पठाण हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसात शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे ब्रेकनंतर आता शाहरुख पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटात शाहरुख आणि जॉन ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.