आर्याच्या मृत्यूचे कारण काय? पोलिस तपासात माहिती आली समोर
मनोरंजन

आर्याच्या मृत्यूचे कारण काय? पोलिस तपासात माहिती आली समोर

कोलकाता : दोन दिवसांपूर्वी आर्या बॅनर्जीचा मृतदेह तिच्या खोलीत आढूळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु, आता शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून आर्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. द डर्टी पिक्चर, लव्ह सेक्स और धोखा अशा काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्या निधनानंतर कलाविश्वात खळबळ उडाली होती. आर्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं सर्वत्र म्हटलं जात होतं. शवविच्छेदनाच्या अहवालात आर्याचा मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

न्यूज 18च्या वृत्तानुसार, शुक्रवारी आर्याचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आला होता. त्यानंतर तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी आलेल्या अहवालात आर्याने मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केलं होतं. मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्यानेच आर्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं आहे. सोबतच तिची हत्या झालेली नाही असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आर्या मदतीसाठी उठली आणि त्याचवेळी ती जमिनीवर कोसळली. आर्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेलं रक्तदेखील तिचंच असून जमिनीवर पडल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. दरम्यान, आर्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिला हृदयाशीनिगडीत काही समस्या आणि अन्य आजार होते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.