मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनौमधून अटक
देश बातमी

मनसे नेत्याच्या मारेकऱ्याला लखनौमधून अटक

मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ता जमील अहमद शेख याच्या हत्या प्रकरणात आरोपी इरफान सोनू शेख मंसूरी उर्फ राजधनिया याला शनिवारी लखनऊ येथून उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाने (STF) अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जमील अहमद शेख यांची हत्या ठाणे जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2020 मध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली होती. एसटीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांना या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील गुलरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निवासी इरफान सोनूने ही मनसे नेत्याची हत्या केली होती.

चौकशीदरम्यान सोनूने सांगितलं की, 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत ओसामा नावाच्या एका व्यक्तीने त्याला बोलवून हत्येचे सुपारी दिली होती. सोनूने दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी किती पैसे दिले गेले याबाबत त्याला माहीत नाही. त्याला दोन लाख रुपये मिळणार असल्याचंही त्याला माहीत नव्हतं. सोनूने सांगितलं की ही हत्या या एका नेत्याच्या सांगण्यावरुन करण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलं आहे.