चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत
बातमी विदेश

चीनच्या विरोधात अमेरिकेचे मोठे पाऊल; शाओमीसह अनेक लोकप्रिय कंपन्या काळ्या यादीत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या लष्कराच्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेत चीनला पुन्हा मोठा दणका दिला आहे. यात चीनची सरकारची तेल कंपनी CNOOC सह अमेरिकेने शाओमी या लोकप्रिय मोबाइल कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने गुरुवारी जारी केलेल्या यादीनुसार, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षितेला धोका पोहचत असल्यामुळे या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले. यात चिनी लष्कराच्या नियंत्रणात अथवा त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या ४० हून अधिक कंपन्यांना चीनने काळ्या यादीत टाकले आहे. शाओमीसह लुओकाँग टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन, बीजिंग झोंगगुनकुन डेव्हलपमेंट इन्वेस्टमेंट सेंटर, गोविन सेमी कंडक्टर कॉर्प, ग्रॅण्ड चायना एअर कंपनी, ग्लोबल टोन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी, कमर्शियल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चायना आदी कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे.

याबाबत अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार, ”दक्षिण चीन समुद्रात चीनकडून बेजबाबदार आणि उकसवणारी कृत्ये सुरू आहेत. चीनकडून या भागाचे संपूर्णपणे सैनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. CNOOC ही चिनी सैन्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बंदीमुळे इतर देशांची संवेदनशील बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठीच्या अभियानाला मोठा झटका लागणार आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने सांगितले की, चीन आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सैन्याला अत्याधुनिक करत आहे. चीन अमेरिकाविरोधी पावले उचलत असताना आम्ही शांत बसू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मागील महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये चिनी लष्करासोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. चीनविरोधात आर्थिक आणि राजकीय आघाडी उघडली होती.