बॉलिवूडला धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शहाचं निधन
मनोरंजन

बॉलिवूडला धक्का! प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शहाचं निधन

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन झालं असून शनिवारी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. तारिक शहा यांना किडनीचा आजार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते डायलेसिसवर होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बहार आने तक, मुंबई सेंट्रल, एहसास, गुमनान है कोई अशा फिल्मसाठी तारिक यांना ओळखलं जायचं. त्यांनी जनम कुंडली, बहार आने तक अशा फिल्म आणि कडवा सच ही टीव्ही सीरिअल दिग्दर्शित केली. निर्मितीचं कामही त्यांनी पाहिलं.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर तारिक यांच्या निधनाची बातमी दिली आहे. दु:खद बातमी. कडवा सच टीव्ही सीरिअल आणि जनम कुंडली फिल्मचे अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं सकाळी निधन झालं. मुंबईतील खासगी रुग्णालया निधन झालं, असं ट्वीट विरल भयानीने केलं आहे.