कोरोनाचा उद्रेक! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ ५० हजारांच्या घरात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाचा उद्रेक! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ ५० हजारांच्या घरात

मुंबई : राज्यात दररोज नव्या कोरोना बाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळत असताना आज (ता. ०३) पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत तो ५० हजारांच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२०ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे.

आज राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.