दिवसभरात राज्यात २०हजाराहून अधिक रुग्ण; ४४३ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिवसभरात राज्यात २०हजाराहून अधिक रुग्ण; ४४३ मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. आज दिवसभरात २० हजार २९५ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तरे ४४३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे ३१ हजार ९६४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आजपर्यंत एकूण ५३ लाख ३९ हजार ८३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४६ लाख ०८ हजार ९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख १३ हजार २१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, सध्या राज्यात २० लाख ५३ हजार ३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २ लाख ७६ हजार ५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.