लिपीकाच्या घरी छापा; सापडलं २ कोटींसह ८ किलो सोनं
देश बातमी

लिपीकाच्या घरी छापा; सापडलं २ कोटींसह ८ किलो सोनं

भोपाळ : एका लिपीकाच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयला तब्बल २.१७ कोटी रुपये आणि ८ किलो सोनं व नोटा मोजण्याची मशीन असं घाबाड सापडलं आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने एफसीआयच्या लिपीकाच्या घरी छापेमारी केली होती, त्यात हे समोर आले आहे. ही कारवाई लाचप्रकरणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच प्रकरणी विभागीय व्यवस्थापकासह चार जणांना रंगेहात पकडले होते. भोपाळमधील छोला भागात लिपीक किशोर मीरा मीणाच्या घरी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयला भ्रष्टाचाराचे काही पुरावे देखील घरून मिळाले आहेत. सांगण्यात येत आहे की, अटक करण्यात आलेल्या तिन्ही व्यवस्थापकांचा भ्रष्टाचाराचा पैसा देखील लिपीक किशोर स्वतःकडेच ठेवत होता, असे सांगण्यात येत आहे.

गुडगावमधील एका सिक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर लिपीक किशोर मीना आणि व्यवस्थापकासह तीन जणांना लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर पुढील कारवाई सुरू झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार किशोर मीना या अगोदर एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. मोठ्या लोकांसोबत भ्रष्टाचारात सहभागी झाल्याने त्याल लिपीक बनवलं गेलं होतं.