मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला असून त्यांचे खासदारपद धोक्यात आले आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
खा. नवनीत राणा यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला असून, आता नवनीत राणा यांचे खासदारपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. खा. राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
दरम्यान निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी खा.नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.