संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
राजकारण

संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज (ता. ४) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेचा संताप पाहता, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आता पुढील कार्यवाही सुरू ठेवावी. असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी रविवारी जाहीर केले. हा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही राज्यपालांकडे पाठविलेला नाही. त्यामुळे हा राजीनामा कुठे आहे, तो तसबीर करण्यासाठी ठेवला आहे का? असा प्रश्न करीत भाजपने विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत या मुद्यावर मौन बाळगले होते.