आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी
क्रीडा

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांची हकालपट्टी केली आहे. जॉर्ज अल्लार्डिस त्यांच्या जागी कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. साहनी यांच्यावर सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. ऑडिट फर्म प्राइसवाटर हाऊस कूपर्सच्या अंतर्गत झालेल्या तपासणीत मनू साहनी यांचे प्रकरण समोर आले. त्याचा कार्यकाळ २०२२मध्ये संपुष्टात येणार होता. त्यांच्यावर बरेच आरोप होते. एका वर्षापासून ते आपल्या कर्मचार्‍यांना योग्य वागणूक देत नव्हते. याचा परिणाम आयसीसीच्या कामावरही होत होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मार्चच्या सुरुवातीला साहनी यांना रजेवर पाठवण्यात आले होते. आयसीसी बोर्डाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की परिषदेतील अनेक कर्मचारी सदस्यांनी साहनींविरोधात तक्रार दिली होती. आयसीसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांचे मनोबल कमी होत होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साहनींवर मागील वर्षापासून दबाव होता. जॉर्ज बार्क्ले आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना खुर्ची गमावण्याची भीती होती. माजी मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांच्या निधनानंतर साहनी यांनी हुकूमशाही मानसिकतेसह काम केले. यामुळे कोणत्याही कर्मचार्‍यांचे भले झाले नाही, असेही अधिकाऱ्यांनीं सांगितले. काही कर्मचारी साहनींवर नाराज होते, कारण त्यांनी आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इम्रान ख्वाजाला पाठिंबा दर्शवला होता.

मनू साहनी यांनी यापूर्वी सिंगापूर स्पोर्ट्स हबचे सीईओ म्हणूनही काम केले आहे. त्यांनी ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. ते फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेड लिमिटेडच्या ऑडिट समितीचे सदस्य आहेत. डेव्ह रिचर्डसन यांच्या निधनानंतर २०१९मध्ये त्यांना आयसीसीचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.