कोरोनाविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयने केली मोठी मदत
क्रीडा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बीसीसीआयने केली मोठी मदत

नवी दिल्ली : भारत सध्या कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळही (बीसीसीआय) मदतीसाठी पुढे आले आहे. बीसीसीआयने १० लीटरचे २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोरोना लढ्याच्या लढाईसाठी देण्याची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत हे कॉन्सन्ट्रेटर देशभरातील गरजू लोकांना देण्यात येतील असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबात बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, कोरोनाविरूद्धच्या लढाईत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा देणार्‍या लोकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि ते अजूनही या व्हायरसविरूद्ध लढाई लढत आहेत. ते आपल्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. बोर्डाने नेहमीच आरोग्य आणि सुरक्षिततेला प्रथम स्थान दिले आहे आणि आम्ही वचनबद्ध आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या मदतीमुळे लोकांना दिलासा मिळेल.

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, कोरोनाविरूद्धच्या या लढाईत आम्ही सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून उभे आहोत. बीसीसीआय संकटाच्या वेळी वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता समजून घेते. अशा प्रयत्नांमुळे देशातील मागणी-पुरवठ्यातील तफावत कमी होण्यास मदत होईल. सध्या लसीकरण मोहीम चालू आहे. मी सर्व पात्र लोकांना लस घेण्याचे आवाहन करतो.