ICC ODI Ranking : फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय; गोलंदाजीत बुमराहची घसरण
क्रीडा

ICC ODI Ranking : फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय; गोलंदाजीत बुमराहची घसरण

नवी दिल्ली : काल टी-२० सामन्यांची आयसीसीने रँकिंग जाहीर केल्यानंतर आज एकदिवसीय सामन्यांची रँकिंग जाहीर करण्यात आली असून फलंदाजीत पहिल्या दोन स्थानावर भारतीय आहेत. विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये मात्र भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताला २-१ ने गमवावी लागली. बुमराहला या मालिकेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली. याचाच फटका त्याला क्रमवारीत बसलेला आहे. दुसऱ्या स्थानावरुन बुमराह तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर अफगाणिस्तानच्या मुजीब उर-रेहमानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात ७०० गुण जमा आहेत. इतर गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या जोश हेजलवूडने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिका संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.