या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
देश बातमी

या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंड़ुलकरने आता डिजिटल गेमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, सचिननं डिजिटल गेमिंगमध्ये २ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जेटसिंथेसिस कंपनीत त्याने गुंतवणूक केली आहे. यामुळे सचिनचे या कंपनीसोबत घट्ट नातं तयार झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन आणि सचिन सागा व्हिआर या खेळाचे भागिदार झाल्याने संबंध आणखी मजबूत झाले आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सचिन सागा या गेममधे सचिन आणि गेम खेळणारी व्यक्ती यांच्यामध्ये एक आभासी बंध निर्माण करण्यात येतो. माझे जेटसिंथेसीसची ५ वर्षांपासून नातं आहे. आम्ही सचिन सागा क्रिकट चॅम्पियन या डिजिटल गेमच्या माध्यमातून प्रवास सुरु केला आहे. एका अनोख्या संकल्पनेसह क्रिकेट अनुभवासह तो मजबूत केला आहे. आतापर्यंत २० मिलियन लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे.

सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळासाठी नवं व्यासपीठ उभं करण्याचा आमचा डिजिटल प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना एक अस्सल गेमिंगचा अनुभव मिळणार आहे, असं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितलं.