शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज
मनोरंजन

शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज

मुंबई : शांतीत क्रांती या वेब सीरिजचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरमधून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या तीन मित्रांची गोष्ट आहे. शांतीत क्रांती ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची गोष्ट आहे. एक साधी रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. ती त्यांना आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि आयुष्यातील कधीही न अनुभवलेल्या गोष्टी अनुभवण्याची संधी देते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शांतीत क्रांती ही शांतता आणि कल्याणाचे प्रतीक असून या शोमध्ये सुंदर पद्धतीने तीन मित्रांची मैत्री दाखवली आहे. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडिपाचा संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅकग्लिन यांचे दिग्दर्शन असलेल्या या शोमध्ये लोकप्रिय मराठी कलाकार अभय महाजन, ललित प्रभाकर आणि आलोक राजवाडे आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. या शोमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिखा तलसानिया मराठीत प्रथमच दिसणार असून ती प्रमुख भूमिकेत दिसेल.

नात्यातील असुरक्षिततेसारख्या समस्या, आयुष्यातील अशाश्वता, अपूर्ण स्वप्ने अशा समस्यांचा सामना करण्यापासून हा शो नवीन दृष्टीकोन आणि शिकवण हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर आणतो. शांतीत क्रांती ही फक्त तीन जवळच्या मित्रांची कथा नाही तर त्यांचा स्वतःचा शोध आणि ओळख यांच्या दिशेने त्यांनी केलेला हा प्रवास आहे. आश्चर्यकारक, हास्याच्या उकळ्या फुटणारे क्षण, रस्त्यावरील अनुभव, दिलखेचक संवाद आणि ताल धरायला लावणारे रॅप संगीत यांच्यामुळे हा शो नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.