आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच
राजकारण

आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं, या मागणीसाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील राजधानी मुंबईत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. काहीही झालं तरी येत्या ११ डिसेंबरला मुंबईत धडकणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं या मागणीसाठी ११ डिसेंबरला एमआयएमतर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र आमच्या मोर्च्याला सरकारकडून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काहीही केलं तरीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबईला मोर्चा काढणारच, असा इशारा एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे मोर्च्यानंतर असदुद्दीन ओवैसी सभेला संबोधित करणार आहे.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जलील म्हणाले की, मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. ज्यात राज्यभरातून अनेक मुस्लिम तरुण सहभागी होणार आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून 320 चारचाकी गाड्या असणार असल्याचं जलील यांनी सांगितलं.

यापूर्वी सुध्दा आम्ही मुंबईत सभेचे आयोजन केले होते, मात्र सरकारमधील काही मंत्र्याच्या दबावानंतर आमच्या सभा रद्द करण्यात आल्या. मात्र आता परवानगी दिली आणि नाही दिली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार जलील यांनी बोलून दाखवला.