मनोरंजन

नव्या नवरीच्या कतरिनाच्या बांगड्यांवर लिहिलेले बायबलचे २ शब्द, खास आहे अर्थ

९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकल्यानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आता त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा पाऊस पडत आहे. कतरिना आणि विकीने सिक्स सेन्स फोर्ट येथे एका खाजगी समारंभात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सप्तपदी घेतल्या. वधू-वरांचा एकही सोशल मीडियावर येऊ नये यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कतरिना आणि विकीने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नववधू कतरिना खूपच सुंदर दिसत होती. सब्यसाचीच्या लेहेंग्याने तर तिच्या सौंदर्यात भर घातली. या सगळ्यात तिच्या लाल रंगाच्या बांगड्या आणि कलीराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘पिंकविला’ मधील रिपोर्टनुसार, कतरिनाने लग्नात जो कलीरा आणि चूडा घातला होता त्यावर काही शब्द लिहिलेले होते जे कतरिनाने स्वतः सुचवले होते. अहवालानुसार, कलीरावर लटकलेल्या नाण्यांवर दोन शब्द लिहिलेले होते, जे बायबलमधून घेतले होते. हे शब्द होते ‘क्लियो’ Cleo आणि ‘एलिशियन.’ Elysian एलिशियन म्हणजे ‘दैवी’.

लग्नानंतर आता कतरिना आणि विकी कौशल मुंबईत परतले आहेत. लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे आणि सिनेस्टारही जयपूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत. ७ डिसेंबरपासून कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. सिक्स सेन्स फोर्टवर हा विवाह सोहळा १० डिसेंबरपर्यंत चालणार होता. शुक्रवारी जंगल सफारीसाठी पाहुण्यांना घेऊन जाण्याचा कार्यक्रम होता आणि कतरिना आणि विकी कौशलही जंगल सफारी करतील अशी अपेक्षा होती. मात्र सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. असे म्हटले जात आहे की विकी कौशल आणि कतरिना कैफ आज म्हणजेच १० डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.