‘आम्हाला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे स्वागत आहे’; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेने चर्चेला आले उधाण
राजकारण

‘आम्हाला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे स्वागत आहे’; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेने चर्चेला आले उधाण

 

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत गेल्यास त्यांचे स्वागत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकीय विश्वात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटांना पाठिंबा देणार का, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

संजय शिरसाट काय म्हणाले?

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते आणि मग ते महाराष्ट्रात आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही आव्हान दिले. घोषणेने कोणीही मुख्यमंत्री झालेला नाही. आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्र्यांचा आवाज होऊ शकत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने बहुमत मिळूनही भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे या समर्थनाची सध्या देशभर चर्चा होत आहे.