डॉ नितीन अंबेकर यांच्या प्रयत्नामुळे नवजात अर्भकास मिळाले जीवदान; नारायणप्रभा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
बातमी मराठवाडा

डॉ नितीन अंबेकर यांच्या प्रयत्नामुळे नवजात अर्भकास मिळाले जीवदान; नारायणप्रभा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

मुखेड : तालुक्यात मोजकेच अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेकांना गंभीर आजार आणि तात्काळ उपचार मिळवण्यासाठी नांदेडलाच पोहचावे लागते. अश्या अडचणींना तोंड देण्यासाठी मुखेड शहरात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अनुभवी डॉक्टरांची गरज आहे. नुकतेच मुखेड येथील डॉ.नितीन अंबेकर यांच्या नारायणप्रभा रुग्णालयात एका नवजात अर्भकाला जीवदान मिळाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

होनवडज येथील सुमित्रा बिचेवाड यांच्या बालकाचा सात एप्रिल रोजी मुखेडच्या शासकीय आरोग्य रुग्णालयात जन्म झाला होता. प्रसूतीपूर्वीच बाळाने पोटातच शी केली होती. त्या बाळाला मेकोनियम एस्पिरेशन सिंड्रोम नावाचा आजार झाला. त्यामुळे त्याला श्वासोच्छवासाचा करणे अवघड जात होते. त्यानंतर त्या बाळाला नारायणप्रभा बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ.नितीन अंबेकर यांनी त्या नवजात शिशुवर तातडीने नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु केले.

नवजात शिशुला सीपॅप या मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. बाळाचा त्रास कमी झाल्यानंतर हळूहळू बाळाची ऑक्सिजन मात्रा कमी करण्यात आली. दोन दिवस ऑक्सिजन व एनजीटीच्या माध्यमातून बाळास दूध देण्यात आले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्या नवजात बाळास विना ऑक्सिजन ठेवण्यात यश आले.

मुखेड मध्ये प्रथमच अश्याप्रकारे नवजात शिशुवर उपचार करण्यात आले असून डॉ.अंबेकर यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. मुखेड सारख्या दुष्काळी भागात अत्याधुनिक बाल रुग्णालय उभारून बालरोग तज्ज्ञ डॉ अंबेकर यांनी मुखेडकरांना मोठा आधार दिला आहे.

लहान बालकांना व विशेषतः नवजात शिशुंना तातडीने अत्यावश्यक सेवा मिळणे आवश्यक असते. वेळीच उपचार मिळाल्यानंतर गंभीर आजार किंवा जीवाचा धोका टाळता येतो. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

डॉ.नितीन अंबेकर,
एमबीबीएस, एमडी (बालरोग तज्ञ)
(संचालक – नारायणप्रभा रुग्णालय, मुखेड)