भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा १० सप्टेंबरला होणार आहे. पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ़जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं असेल, हे आता समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत आणि पाकिस्तान आता आशिया कपच्या सुपर ४ फेरीत दाखल झाले आहे. या फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना झाला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना बांगलादेशबरोबर झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर विजय साकारला होता. दुसरीकडे भारताचा सुपर फेरीत पाकिस्तानबरोबर पहिला सामना असणार आहे. त्यानंतर भारताचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर सुपर ४ च्या गुणतालिकेत मोठा बदल होऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तानचा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना पुन्हा समान गुण दिले जातील. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाना समान १ गुण दिला जाणार आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ हा २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जर पाकिस्तानला १ गुण मिळाला तर ते पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होणार आहेत. दुसरीकडे भारताला एक गुण मिळेल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी ९ सप्टेंबरला श्रीलंक व बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्यांना दोन गुण मिळतील आणि ते दुसऱ्या स्थानावर पोहोचतील. त्यामुळे भारतीय संघ एका गुणासह तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. त्यामुळे जर १० सप्टेंबरला होणारा सामना रद्द झाला तर भारतापेक्षा त्याचा फायदा पाकिस्तानाच जास्त होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर ४ मधील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण जरी दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही तर भारत आणि पाकिस्तान यांना समान एक गुण दिला जाईल.