3D फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो iPhone 15 Ultra; लीक झाली माहिती
टेक इट EASY

3D फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो iPhone 15 Ultra; लीक झाली माहिती

iPhone 15 Ultra च्या कॅमेऱ्याबद्दल नवीन माहिती लीक झाली आहे. अ‍ॅप्पलची नवीन iPhone 15 सीरीजमध्ये पुढील आठवड्यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max किंवा iPhone 15 Ultra मॉडेल सादर केले जातील. ह्यातील अल्ट्रा मॉडेलमध्ये 3D फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर करण्याची क्षमता असू शकते. रिपोर्टनुसार, ह्या आयफोननं कॅप्चर केलेले फोटोज आणि व्हिडीओज Apple Vision Pro मध्ये बघता येतील. ह्यात स्पॅशियल फोटोज आणि व्हिडीओज हा यूनिक फीचर मिळेल, ज्याचा वापर व्हिजन प्रो इमर्सिव्ह ३डी कंटेंटसाठी केला जाऊ शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३डी कॅमेरा असलेला आयफोन
MacRumors च्या रिपोर्टनुसार, एका टिप्सटरने चीनी सोशल मीडिया अ‍ॅप Weibo वर iPhone 15 Ultra च्या कॅमेऱ्याची माहिती दिली आहे. लीकनुसार, ह्यात अ‍ॅप्पलचा पहिला थ्री-डायमेंशनल कॅमेरा दिला जाऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून स्पॅशियल ऑडियो, फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर करता येईल आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवता येईल. नंतर हे फोटो आणि व्हिडीओ iCloud च्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करता येतील आणि संपूर्ण डिटेलिंगसह Apple Vision Pro हेडसेटमध्ये पाहता येतील.

कधी येतोय Apple iPhone Ultra
अ‍ॅप्पलच्या आगामी iPhone 15 Ultra मध्ये थ्रीडी D कॅमेरा मिळू शकतो. यासाठी रियर कॅमेऱ्याच्या हार्डवेयरमध्ये बदल अपेक्षित आहे. सध्या iPhone 14 Pro Max मध्ये वाइड अँगल, टेलीफोटो, अल्ट्रा वाइड कॅमेरा, LiDAR स्कॅनर आणि अडॅप्टिव ट्रू टोन फ्लॅश मिळतो. लीकनुसार आगामी iPhone 15 Ultra मध्ये 3D कॅमेऱ्याचा समावेश केला जाऊ शकतो.

iPhone 15 Ultra चे संभाव्य स्पेसिफिकेशन
iPhone 15 Ultra चे नाव iPhone 15 Pro Max देखील असू शकते. ज्यात ६.७ इंचाचा सुपर रॅटीना एक्सडीआर डिस्प्ले मिळू शकतो, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा डायनॅमिक आयलंड डिस्प्ले आणि बारीक बेजल्ससह बाजारात येऊ शकतो. हा A17 Bionic चिपसेट आणि मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. ह्या मॉडेलमध्ये 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. सर्वात मोठा बदल म्हणजे यूएसबी टाइप सी थंडरबोल्ट चार्जिंग पोर्ट.