लसीकरण, कोरोनाची दूसरी लाट आणि सुरक्षिततेचा आभास निर्माण करणारा पेल्टझ्मन सिध्दांत
ब्लॉग

लसीकरण, कोरोनाची दूसरी लाट आणि सुरक्षिततेचा आभास निर्माण करणारा पेल्टझ्मन सिध्दांत

जेव्हा सुरक्षा योजनांची अधिक प्रमाणात खबरदारी घेतली जाते, तेव्हा लोक जास्त प्रमाणात धोकादायक वर्तनात व्यस्त होतात. १९६० साली शिकागो येथे वाहनांमध्ये सीट बेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला होता आणि या नियमाची कडक अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु, यादरम्यान अचानक वाहनांच्या अपघाताचे प्रमाणही नियम येण्याआधीच्या तुलनेत वाढलं. या गोष्टीवर सूक्ष्म अर्थतज्ञ सॅम पेल्टझ्मन यांनी १९७५ साली एक संशोधन केले होते, तेव्हा त्यांनी आपल्या संशोधन अहवालात पुढील महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. सर सॅम पेल्टझ्मन म्हणतात की, “सुरक्षा कवच मिळतं आणि त्याचं नियमन जेव्हा जास्त कडक होतं, तेंव्हा सर्वत्र चालु असलेलं उपययोजनांचं नियमन पाहून आपण पूर्णता: सुरक्षित आहोत हा समज लोकांमध्ये घट्ट होतो आणि कवच मिळण्याआधीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे सहज दुर्लक्ष करण्याची मानसिकता तयार होते आणि निष्काळजीपणा वाढतो, आपण सुरक्षा कवच वापरत आहोत आता काही होत नाही या विचाराने, आपण प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करतो आणि नकळत अधिकाधिक धोकादायक वर्तनात व्यस्त होतो.” सॅम पेल्टझ्मन यांनी केलेल हे संशोधन असल्या कारणाने याला पेल्टझ्मन सिधांत (Peltzman Effect) असे नाव देण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डिसेंबेर २०१९च्या अखेरीस अचानक कोविड-१९ हा रोग उद्भवला आणि अवघ्या काही महिन्यातच याचा प्रसार सर्व जगभर पसरला. जवळजवळ संपूर्ण जग काही काळ ठप्पं झालं, अर्थव्यवस्था मोडकळीस आली, जनजीवन उध्वस्त झालं, खुप लोकांनी आपले प्राणही गमावले. नवीन आजार असल्याने वैद्यकिय यंत्रणाही हतबल झाली. जगभरातील वैज्ञानिक या महाभयानक रोगावर उपाय शोधण्यासाठी अहोरात्र झटत होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आलं, अवघ्या काही महिन्यातच कोविड-१९ या रोगावर ४-५ विविध संशोधन गटाला थोड्या जवळपास काळात यशस्वी लस सापडली. तोपर्यंत या विषाणूचा कहरही ओसरायला सुरवात झाली. जनजीवनही सुरळीत होण्यास सुरवात झाली होती. जगभरात लसीकरण जोरात चालू झालेलं अजूनही चालूच आहे.

या सर्व गोष्टींमध्ये विषाणूही आपल्या उत्परिवर्तनात (Mutataion) यशस्वी झाला. नैसर्गिकरित्या पाहिलं तर लक्षात येईल की उत्परिवर्तन (Mutataion) ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे. सृष्टीतील प्रत्येक जीव हा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सभोवतालच्या वातावरणाशी अनुरूप स्वतः मध्ये बदल करत असतो. त्या प्रमाणे कोरोनाने ही हेच केले, आणि या विषाणूचा अद्यावत प्रकार पुन्हा नव्या जोमाने परत अवतरला. यावेळेस विषाणूने आपल्यामध्ये पृथ्वी वरील विविध भागाअनुरूप स्वतःमध्ये अद्यावत बदल करून घेतलेले आहेत. याच सोबत कोविड-१९ विरोधी लसीच कवच मिळालं म्हणून लोकांचं लसीपूर्वी अंमलात आणत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत आणि अधिकाधिक धोकादायक वर्तनात व्यस्त झाली आहेत, येथेच पेल्टझ्मन सिधांत चालु होतो.

कोरोनाचा कहर पहिल्या पेक्षा जास्त जोरात दिसून येत आहे. दूसऱ्या लाटेच्या तडाख्यात आपण जास्त वेढले गेलो आहोत. थोडंसं पुढील उदाहरणावरून पाहू, तुमच्या माहितीत एखादी तरी व्यक्ती असेल जो काही महिन्यापासून हजारो कोविड-१९च्या रुग्णांचा इलाज केला, यासोबतच काल परवाच तर त्याने कोविड -१९ लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आणि तरीही ती व्यक्ती आज पॉजिटीव्ह आली. “या घटना, या चर्चा आपण आजकाल सर्रास एकत आहोत. तसेच संशोधनातील काही निरीक्षणात असही समोर आलं आहे की, सध्या PPE किटचा वापरही मोठ्या प्रमणात कमी झाला आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी दिसणारी गर्दी, तिथे सोशल डिस्टंसचा उडणारा फज्जा, बिना मास्कची फिरणारी माणसं. हे लोकांचा बिनधास्तपणाचं वागणं हे, आता कोविड -१९ विरुद्धची लस आली आणि आपण पूर्णतः सुरक्षित आहोत या भावनेच द्वेतकं आहे, अजून बारीक अभ्यासाअंती हे लक्षात येतं की, लसीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर किंवा लसीकरण झालेली आकडेवारी पाहूनच काही लोक स्वतः पूर्ण पणे सुरक्षित असल्याचा समज करून घेतात, आणि येथेच खरा पेल्टझ्मन सिद्धांत महत्वाची भुमिका बजावतो. यासाठी सद्यस्थितीचा विचार करता कोविड -१९ आजार त्यावरील लस याबाबतीत संपुर्ण योग्य माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

यासंदर्भातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे-
१) शरीरात कोविड -१९ विरुद्धची रोग प्रतिकारशक्ती ही लसीचा पहिला किंवा दूसरा डोस घेतल्या नंतर तत्काळ तयार होत नाही. लसीचा पूर्ण प्रभाव निर्माण होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यंचा कालावधी लागतो लागू शकतो.

२) लसीकरणानंतर तयार होणारी रोगप्रतिकार शक्ती ही पूर्णता रोग होवू नये यासाठी सक्षम नसते, परंतु यामुळे रोग झाल्यानंतर त्याची दाहकता कमी होण्यासाठी मदत होते किंवा क्वचितच फार कमी प्रमाणात मृत्यूची हानी होऊ शकते.

३) याबरोबर अजून एक मुद्दा म्हणजे सध्या कोरोना या आजारावर ४-५ पाच कंपनींनी विविध प्रकारात तयार केलेली लस उपलब्ध आहे, म्हनून प्रत्येक कंपनीच्या लसीचा प्रभाव हा वेगवेगळा आहे.

४) कोरोना या आजाराच्या विषाणूमध्ये झालेले जनुकिय बदल यामुळे या विषाणूचे विविध प्रकार समोर आलेले आहेत. या विविध प्रकारातील विषाणूवर प्रत्येक लसीचा प्रभावही एकसारखा नाही. एक उदाहरण द्यायच झाल तर, कोरोनाचा बी॰३५१ (हा दक्षिण अफ्रिका येथे उत्परिवर्तित झालेला प्रकार आहे) यावर सर्वच लसीचा प्रभाव कमी प्रमाणात होताना दिसत आहे.

वरील बाबींचा विचार करता कोरोना लस जरी उपलब्ध असली तरी, प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत कसूर करून अजिबात चालणार नाही हे अधोरेखित होत आहे. आपल्याकडे जेव्हा कोणतंही सुरक्षा कवच नसतं तेव्हा धोक्याच्या भीतीने आपली वागणुक ही खुप कळजी पूर्वक होत असते. याऊलट जेव्हा आपल्याकडे एखादं सुरक्षा कवच असतं, तेव्हा सुरक्षा कवच आहे आपण आता पूर्णपणे सुरक्षित आहोत. या चुकीच्या समजातून आपली वागणूक नकळतच बेधडक व बिनधास्त पणाची होऊन जाते व आपण जास्त धोकादायक वर्तन करू लागतो आणि सर सॅम पेल्ट्झमन यांच्या सिद्धांतास पूरक वर्तन करू लागतो.

सद्यस्थितीचा विचार करता कोरोनाची लस ही तत्काळ रोगांविरुद्ध संरक्षण करत नाही, त्याच बरोबर लस ही संपूर्ण संरक्षणही करत नाही. लसीचा ठराविक डोस पूर्ण झाल्यानंतर साधारणत: २ आठवड्याने लसीचा प्रभाव चालू व्हायला सुरवात होते. हा प्रभाव येण्यासाठी ठराविक काळ देणे खूप गरजेचे आहे. तसेच, लस घेतल्यानंतर ही कोविड-१९ रोग होवू शकतो, पण त्याची दाहकता कमी असू शकते, यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच, योग्य सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी स्वच्छ हात धुणे, तोंडाला मास्क लावणे, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडणे इ. प्रकारे शक्य तेवढी स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यायाने आपल्या परिसराची काळजी घेणे हेच खरे शहाणपण आहे.

लसीकरणचा खुप मोठा टप्पा अजून बाकी आहे, जगभरात लसीची वाढती मागणी, त्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक गणिते, यासाठी लागणारा कच्च्या मालाची उपलब्धता, त्याची वाहतूक. यासर्वांचा विचार करता लसीकरण हा किमान एक किंवा जास्त वर्ष चालणारा कार्यक्रम असू शकतो, तोपर्यंत आपला नंबर येईल तेव्हा लस घेणे आणि सर्व ठीक होत नाही तोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय पाळणे हे खुप महत्वाचे आहे.

लेखक : डॉ. ऋषि आंधळकर
लेखक नामांकित डॉक्टर आहेत