पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी
पुणे बातमी

पुण्यात डॅशबोर्ड तातडीने कार्यन्वित करण्याची राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

पुणे : कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पर्यायाने रूग्णांना तातडीने बेड ऊपलब्ध करून देणेसाठी रिअल टाईम डॅशबोर्ड कार्यरत होणे गरजेचे असून लसीकरण नोंदणी, प्रवेश प्रक्रिया, ट्रॅव्हल बुकिंग इ. सर्व काही ॲानलाईन होत असतांना व टेक्नॅालॅाजी ऊपलब्ध असतांना, आय टी हब असलेल्या पुणे शहरात हा डॅश बोर्ड का कार्यान्वीत होत नाही..? असा प्रश्न राजीव गांधी स्मारक समिती आणि प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे मनपा अखत्यारीतील ११ हजार ५०० बेड्सच्या ऊपलब्धतेची अद्यावत माहीती – रियल टाईम डॅश-बोर्ड मा विभागीय आयुक्तांनी आपल्या अखत्यारीत घ्यावा व (मुंबईचे धर्तीवर) पुणे शहरांतील कोविड बेड्सची अद्यावत माहीती देणाऱ्या डॅशबोर्डची यंत्रणा ऊभी करावी, या मागणी करीतां राजीव गांधी स्मारक समिती तर्फे शिष्टमंडळ मंगळवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात आली व सोबत निवेदन देण्यात आले.

यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ. जयश्री तोडकर, आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, आयएमए पुणे अध्यक्ष डॉ. बी. एल देशमूख, मा. नगरसेवक प्रशांत बधे, डॉ. अभिजीत मोरे, रविंद्र माळवदकर व स्थायी समिती माजी अध्यक्ष शाम देशपांडे, शहर काँग्रेस ऊपाध्यक्ष सुर्यकांत मारणे आदी उपस्थित होते.