राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जोरदार घट; रिकव्हरी रेट ९३.५२ टक्क्यांवर
कोरोना इम्पॅक्ट

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जोरदार घट; रिकव्हरी रेट ९३.५२ टक्क्यांवर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधिताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून रोजच्या कोरोनाबाधितांच्या आकड्यांत कमालीची घट होऊन ती संख्या ४ हजारांच्या खाली आली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आज देखील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवसभरात राज्यात ७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे. याशिवाय, राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७१ हजार ९१० असून, १७ लाख ४७ हजार १९९ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख २ हजार ४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.