इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक
क्रीडा

इंग्लंडचा संघ येणार भारत दौऱ्यावर; पाहा वेळापत्रक

नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका संपवून परत आल्यानंतर संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज या दौऱ्याची घोषणा केली. इंग्लंडचा संघ २०२० मध्ये भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा दौरा पुढे ढकलण्यात आला. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयकडून देण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत. यातील दोन सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे.

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

५ ते ९ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना – चेन्नई
१३ ते १७ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना – चेन्नई
२४ ते २८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना – अहमदाबाद (दिवस-रात्र)
४ ते ८ मार्च – चौथा कसोटी सामना – अहमदाबाद
————-

१२ मार्च – पहिला टी-२० सामना
१४ मार्च – दुसरा टी-२० सामना
१६ मार्च – तिसरा टी-२० सामना
१८ मार्च – चौथा टी-२० सामना
२० मार्च – पाचवा टी-२० सामना
सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येतील
————

२३ मार्च – पहिला वन डे सामना
२६ मार्च – दुसरा वन डे सामना
२८ मार्च – तिसरा वन डे सामना
सर्व वन-डे सामने पुण्याच्या मैदानावर खेळवण्यात येतील.