अक्षय कुमारच्या बच्चन पांडेमध्ये हा कलाकार साकारणार खलनायकाची भूमिका
मनोरंजन

अक्षय कुमारच्या बच्चन पांडेमध्ये हा कलाकार साकारणार खलनायकाची भूमिका

मुंबई : अक्षय कुमारच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटामध्ये एका नव्या कलाकाराची एंट्री झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बच्चन पांडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे सांगितले आहे. अभिमन्यू सिंग बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिमन्यूने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील गुलाल, रक्षी चरित्र, मॉम, गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. आता अभिमन्यूला अक्षय कुमारसोबत पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

अक्षयचा बच्चन पांडे चित्रपट २६ जानेवारी २०२२ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाने केली असून दिग्दर्शन फरहाद सामाजी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, क्रिती सेनॉन आणि अभिनेता अर्शद वारसी देखील आहे.