शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच
राजकारण

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच

मुंबई : रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही शंभुराज म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर तर या प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि सत्य उघड होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत. त्यांच्या कारवर शिवसेनेबाबतचा एक स्टीकर लावल्याचं दिसून आलं.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते शिवसैनिक असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या त्या इसमांवर तातडीनं कारवाई करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचलत गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म ऍक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सिताराम मिश्रा, राम मनोज यादव या मुंबईत राहणाऱ्या चौघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.