बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन; अभिनेत्याला एअरपोर्टवरून अटक
मनोरंजन

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन; अभिनेत्याला एअरपोर्टवरून अटक

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खानला एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शादाबच्या चौकशीतूनच एजाज खानचं नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला अखेर एनसीबीनं अटक केलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एजाज खानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीनं मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती मिळत आहे. एजाज खान आज राजस्थानमधून मुंबईमध्ये दाखल झाला होता, तेव्हा विमानतळावरूनच त्याला एनसीबीनं अटक केली आहे

एजाज खानला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. शोच्या नियमानुसार स्पर्धक एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत. मात्र, शोदरम्यान एजाज खानने एका स्पर्धकावर वादावादीमध्ये हात उचलल्यामुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. द कपिल शर्मा शोमध्ये देखील एजाज खाननं वाद घातल्याचं समोर आलं होतं. त्यासोबतच चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील एजाजने भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे बॉलिवुडसोबतच छोट्या पडद्यावर देखील एजाजनं चांगलंच बस्तान बसवलं आहे. मात्र, आता ड्रग्ज प्रकरणात एजाज अडकण्याची शक्यता आहे.