मी त्याच्यासोबत झोपायला तयार; अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
मनोरंजन

मी त्याच्यासोबत झोपायला तयार; अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील दलित विद्यार्थिनीच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एका टॉलिवूड अभिनेत्रीने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने या प्रकरणी धक्कादायक विधान केलं आहे. रेखाने या प्रकरणी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे. रेखा म्हणाली, जो कुणी त्याची हत्या करेल, त्याच्यासोबत मी झोपेन. या धक्कादायक विधानानंतर तिने हा व्हिडीओ पाहून आपण इमोशनल झाल्याचं म्हटलं. मला माफ करा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी काय म्हणते आहे ते मलाच समजत नाही आहे. आपण आज किती हतबल आहोत. रामयाला न्याय मिळायलाच हवा, असं रेखा म्हणाली.

गुंटूर जिल्ह्यातल दलित इंजिनीअरिंग विद्यार्थिनीची भररस्त्यात चाकूने हत्या करण्यात आली. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील ही विद्यार्थिनी आपल्या घरी परतत होती. तेव्हा एका बाईकस्वार तरुणाने तिला आपल्या बाईकवर बसायला सांगितलं. पण तिने नकार दिल्याने त्याने तिथंच तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आहे.