राजनीती चित्रपटाच्या अभिनेत्रीला करावी लागली इमर्जन्सी सर्जरी; लिहिली भावनिक पोस्ट
मनोरंजन

राजनीती चित्रपटाच्या अभिनेत्रीला करावी लागली इमर्जन्सी सर्जरी; लिहिली भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनेत्री श्रुती सेठीला नुकतीच एक इमर्जन्सी सर्जरी करावी लागली. त्यानंतर श्रुतीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा स्वत:चा रुग्णालयातील फोटो आणि भलीमोठी पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयीची माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अचानक तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि सर्जरीनंतर तिची तब्येत ठीक असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं. त्यासोबतच आरोग्याला कधीच गृहीत धरू नका, असं तिने चाहत्यांना सांगितलंय. इमर्जन्सी सर्जरीमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना २०२०ने चांगलाच धक्का दिला आहे. माझे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सर्व प्लॅन्स मला रद्द करावे लागले. मला जो धडा घ्यायचा होता तो कदाचित मी घेतला नव्हता. म्हणूनच मला आता त्याची शिक्षा मिळतेय. तुम्ही तुमच्या आरोग्याला कधीच गृहीत धरू नका. रोज सकाळी तुम्हाला डोळे उघडून जग बघण्याची संधी मिळतेय आणि रोज रात्री तुम्ही शांत झोपू शकता यासाठी कृतज्ञ राहा, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचसोबत चाहत्यांना अनेक सल्लेसुद्धा तिने दिले आहेत.

श्रुतीने अल्पावधीतच छोट्या पडद्यावर स्वत:ची ओळख निर्माण केली होती. श्रुतीने आतापर्यंत शरारत, देश मे निकला होगा चांद, क्यों होता है प्यार आणि कॉमेडी सर्कस या मालिका व शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने राजनिती, फना आणि आगे से राइट या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.