माजी मिस इंडिया मानसी सेह्गलचा आम आदमी पार्टीत प्रवेश
मनोरंजन

माजी मिस इंडिया मानसी सेह्गलचा आम आदमी पार्टीत प्रवेश

नवी दिल्ली : माजी मिस इंडिया -२०१९ मानसी सेहगल हिने राजेंद्र नगरचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. ”मला अगदी लहान वयातूनच समाजासाठी काहीतरी चांगले करायचे आहे,” अशी प्रतिक्रिया मानसीने यावेळी दिली. तर राघव चड्ढा यांनी तिचे पक्षात स्वागत केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण संपल्यानंतर मानसी सहगल हिने नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे. मानसीही एक प्रशिक्षित अभियंता, टेडएक्स स्पीकर आणि उद्योजक आहे, तिचे स्वतःचे स्टार्टअप आहे. विशेष म्हणजे मिस इंडिया दिल्ली स्पर्धेदरम्यान मानसीने आपला परिचय करुन देताना स्वत: ला समाजसेवा करण्याची आवड असल्याचे सांगत अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तर यावेळी बोलताना राघव चड्ढा म्हणाले की, मी मानसी यांचे आपल्या कुटुंबात स्वागत करतो. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हे युवकांमध्ये राजकारणात येण्याची आणि लोकांची सेवा करण्याचा विश्वास वाढवत आहे, याचा मला आनंद आहे. आम आदमी पार्टीचे कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे.

आप मध्ये प्रवेश केल्यानंतर मानसीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आम आदमी पार्टीत येण्यास कशामुळे प्रेरणा मिळाली, असा सवाल केल्यानंतर मानसीने सांगितले सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमुळे व आमदार राघव चड्ढा यांच्या कठोर मेहनतीमुळे प्रेरित होऊन मी आम आदमी पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच, कोणत्याही देशाच्या समृद्धीसाठी आरोग्य आणि शिक्षण हे दोन मुख्य मार्ग आहेत आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात प्रचंड बदल घडवून आलेला दिसून येत आहे, असे मानसी सहगल म्हणाली.
इतकेच नव्हे तर, युवकांनी, विशेषत: महिलांनी आमच्यासोबत राजकारणात सहभागी व्हावे आणि

राजकारणात बदल घडवावा, असे सांगत मानसीने महिलांना आणि युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, दिल्लीशिवाय आता आम आदमी पार्टीची इतर राज्यांत चांगली कामगिरी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने अनपेक्षित यश मिळवले. पार्टीने जवळपास १० जागांवर आघाडी घेतली होती.