केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या दिग्दर्शकाची बाजी
मनोरंजन

केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या दिग्दर्शकाची बाजी

मुंबई : केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने बाजी मारली आहे. त्याच्या स्थलपुराण या चित्रपटाने महोत्सवामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट आणि भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक या दोन पुरस्कारांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा अक्षयला मिळालेला सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट हा मानाचा पुरस्कार आशियातल्या सिनेमांच्या विकासासाठी स्थापित असलेल्या एका जागतिक संस्थेकडून दिला जातो. केरळमध्ये ७० च्या दशकापासूनच अत्यंत दर्जेदार असे सिनेमे बनत आहेत. मात्र त्याठिकाणी अक्षयच्या मराठमोळ्या स्थलपुराण या चित्रपटाने आपला झेंडा रोवला आहे. पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

अक्षय इंडीकरला यापूर्वी आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. स्थलपुराण या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियातील आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी, ग्रिफिथ स्कूल आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.8