ठाकरे सरकारने घेतला तो निर्णय; करिश्माने विकलं घर
मनोरंजन

ठाकरे सरकारने घेतला तो निर्णय; करिश्माने विकलं घर

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूरने घर विकलं आहे. विशेष म्हणजे हे घर विकण्यामागे एक खास कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला हे घर विकणं सोईस्कर ठरल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे सरकारने फ्लॅट मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर करिश्माने हे घर विकल्याचं म्हटलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

करिश्मा कपूरने तिचा मुंबईतील खार परिसरातील फ्लॅट विकला आहे. तब्बल १०.११ कोटी रुपयांना हा फ्लॅट विकल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी अलिकडेच मुद्रांक शुल्कात कपात करण्याचं जाहीर केले आहे. याच संधीचा फायदा घेत करिश्माने तिचं घर विकलं आहे. २० डिसेंबर रोजी या घराची नोंद झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, करिश्माने तिच्या मालमत्तेवर २०.२२ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. करिश्माचं हे घर आभा दमानी यांनी खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे करिश्मा कलाविश्वापासून दूर गेली आहे. मात्र, आजही तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची चाहत्यांमध्ये कायम चर्चा रंगते.