यशराज फिल्म्सची मोठी घोषणा; यंदाच्या वर्षात येणार ५ नवे चित्रपट
मनोरंजन

यशराज फिल्म्सची मोठी घोषणा; यंदाच्या वर्षात येणार ५ नवे चित्रपट

मुंबई : यशराज फिल्म्सनं आपल्या या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची घोषणा केली आहे. या वर्षी म्हणजे २०२१ साली यशराज फिल्म्सचे ५ बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यशराज फिल्म्सने आपल्या ५ बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा काल जाहीर केल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यशराज फिल्मसचे आगामी ५ चित्रपट
१. संदिप और पिंकी फरार
दिग्दर्शकः दिबाकर बॅनर्जी
प्रमुख कलाकारः अर्जुन कपूर, परिणिती चोप्रा
प्रदर्शनाची तारीखः १९ मार्च २०२१

२. बंटी और बबली-२
अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी यांच्या २००५ सालच्या बंटी और बबली या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
दिग्दर्शकः वरुण शर्मा
प्रमुख कलाकारः सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी वाघ
प्रदर्शनाची तारीखः २३ एप्रिल २०२१

३. शमशेरा
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या डाकूंच्या संघर्षाचा इतिहास सांगणारा हा चित्रपट असणार आहे.
दिग्दर्शकः करण मल्होत्रा
प्रमुख कलाकारः रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त
प्रदर्शनाची तारीखः २५ जून २०२१

४. जयेशभाई जोरदार
दिग्दर्शकः दिव्यांग ठक्कर
प्रमुख कलाकारः रणवीर सिंग, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह, शालिनी पांडे
प्रदर्शनाची तारीखः २७ ऑगस्ट २०२१

५. पृथ्वीराज 
दिग्दर्शकः चंद्रप्रकाश द्विवेदी
प्रमुख कलाकारः अक्षय कुमार, संजय दत्त, मनुशी छिल्लर, सोनू सूद
प्रदर्शनाची तारीखः ५ नोव्हेंबर २०२१