लग्नानंतरच्या दोन महिन्यातच संतापली सना खान; केली सोशल मीडिया पोस्ट
मनोरंजन

लग्नानंतरच्या दोन महिन्यातच संतापली सना खान; केली सोशल मीडिया पोस्ट

मुंबई : लग्नानंतर दोन महिन्यांतच अभिनेत्री सना खान संतापली आहे. इस्लामसाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. आता सनाच्या लग्नाला जवळपास दोन महिने झाले असून तिने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टद्वारे तिने संताप व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, गेल्या काही दिवसांपासून काही लोकं माझे निगेटीव्ह व्हिडीओ तयार करत आहेत तरी देखील मी शांत बसले. पण आता एका व्यक्तीने माझ्या भूतकाळावर एक व्हिडीओ तयार केला आहे आणि तो या व्हिडीओमध्ये काहीही बोलत आहे. तो व्हिडीओ पाहून मला वाईट वाटले असे म्हटले आहे.

मला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही. ती व्यक्ती माझ्यासोबत तशी वागली म्हणून मी त्याच्यासोबत तसे वागणार नाही. जर कोणाची प्रशंसा करता येत नसेल तर शांत रहा. पण अशा प्रकारे कमेंट करत कोणालाही नैराश्यामध्ये जाऊ देऊ नका. त्या व्यक्तीला त्याच्या भूतकाळामुळे दोषी ठरवू नका या आशयाची पोस्ट सनाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सनाने बिग बॉसच्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता.