अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी
क्रीडा

अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी

चेन्नई : आयपीएलच्या यावर्षीच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या संघात सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळणार का? याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अर्जुन तेंडुलकरने नुकतीच झालेल्या मुश्ताक अली चषकादरम्यान मुंबईच्या संघाकडून पदार्पण केलं होतं. यंदा पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. अर्जुन तेंडुलकर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो.