केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….
पुणे बातमी

केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश; तरच पुण्यात या….

पुणे : केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केरळमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट शहरात येण्यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश गुरूवारी दिले आहेत. याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनासही याबाबत राज्य शासनाच्या सुचनेनुसार याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रेल्वे, विमान व बससह केरळमधून खासगी वाहनांनी येणाऱ्या सर्वांची तपासणी करणे बंधनकारक झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यातही कोरोनाचे नियम सक्तीने पाळण्याचे बजावण्यात आले आहे. त्यामुळेच, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावलं उचलली आहेत. या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच, त्यानुसार लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

दरम्यान, केरळमध्ये बाधित रुग्णसंख्या वाढली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्याच आठवड्यापासून केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. यापूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. आता केरळमधील रुग्णसंख्या वाढू लागल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.